रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

0
295

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित दादा पवार यांच्यावर सूडबुद्धीने ईडीची कारवाई होत आहे. एक फेब्रुवारीला त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी येथे, एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन झाल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून घंटानाद आंदोलन
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार गटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं. विरोधी पक्षातील अनेक लोकांचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकार व राज्य सरकार कडून केला जात असून त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन झालं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार रोहित पवार यांच्यावर वारंवार होणाऱ्या ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे.