मुलाची आत्महत्या पाहून आई-वडिलांनी केले हे धक्कादायक कृत्य

0
143

ग्वाल्हेर, दि. २९ (पीसीबी) – मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच आणि त्याचा मृतदेह समोर दिसताच त्याच्या आई वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत शेजाऱ्यांना दोन ते तीन दिवस काहीही कळलं नाही. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तीन मृतदेह फास लावलेल्या स्थितीत आढळून आले. ग्वाल्हेरमधल्या हुरावली भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना रविवारी ही घटना समजल्याचंही सांगितलं जातं आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ज्या मुलाने आत्महत्या केली त्याची आई शाळेत मुख्याध्यापिका होती तर वडील प्रॉपर्टी डीलर होते. या दोघांनी त्यांच्या मुलाला मृतावस्थेत पाहिलं आणि या दोघांनीही गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांना जेव्हा या घटनेबाबत कळलं तेव्हा पोलीस या ठिकाणी पोहचले. तेव्हा त्यांना घरात तीन मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकत असल्याचं दिसलं. तसंच फरशीवर मोठ्या प्रमाणावर रक्त सांडल्याचंही दिसून आलं.