कृष्णानगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
137

निगडी, दि.29 (पीसीबी) – शुक्रवारी मोठ्या उत्साहात भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशभरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या खास प्रसंगी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तर काही ठिकाणी आरोग्याशी संबंधित शिबिरं देखील आयोजित करण्यात आली होती.

कृष्णानगर तरुण मित्र मंडळाच्या ( से.२७अ, निगडी प्राधिकरण) ४० व्या वर्धापन दिना निमित्त व ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त कृष्णानगर येथे रक्तदान शिबिर व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यात 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले व जवळ जवळ 200 महिलांनी हिमोग्लोबीन तपासणी चा लाभ घेतला.