आयुष्यमान भारत योजननेच्या लाभार्थ्यांना स्मार्टकार्ड वाटप

0
325

चिंचवड, दि.२८(पीसीबी)- माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे व आयुष्यमान भारत योजननेच्या लाभार्थ्यांना स्मार्टकार्ड वाटप

भारताते कर्तृत्ववान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने चिंचवडगावातील गोखले हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.

तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे आयोजित विविध लोकोपयोगी योजनांच्या शिबिरात सहभागी झालेल्या हजारो लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड, आधार स्मार्ट कार्ड व मतदार स्मार्ट कार्डचे चिंचवड विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, भाजपा प्रदेश मुख्यलयाचे प्राभारी श्री रविंद्रजी अनासपुरे, जेष्ठ नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते महेशजी कुलकर्णी, श्रीराम मंदिर देवस्थानचे विश्वस्त चिंतामणी बावळे, चिंचवडगाव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेशजी इनामदार, बी शार्प क्लासेसचे संचालक प्रा.सुनिलजी खर्डे सर, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे मा.शहराध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण कुलकर्णी सर, महिलांचे व्यासपीठ प्रयास ग्रुपच्या सौ.शोभाताई निसळ व सौ.चंद्रकलाताई शेडगे, भाजपा मा.शहर उपाध्यक्ष पाटीलबुवा चिंचवडे, दत्ताभाऊ चिंचवडे, शेखर चिंचवडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदिपजी सायकर, प्रशांत आगज्ञान, फ्रेंड्स ॲाफ बीजेपीचे चिंचवड विधानसभा संयोजक रविंद्रजी प्रभुणे, भोसरी विधानसभा विस्तारक धनंजय शाळिग्राम, पोलीस मित्र संघटनेचे सुभाषजी मालुसरे, टाटा मोटोर्सचे कामगार नेते विश्वास राऊत, भाजयुमोचे शहर सरचिटणीस शिवम डांगे, पराग जोशी, ज्ञानेश्वर मेहेरवाडे, अतुल कांबळे, शुभम मिसरी या प्रमुख कार्यकर्त्यांसह पक्षाचे चिंचवडगावातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते.

‘मन की बात’ कार्यक्रम पाहण्यासाठी चिंचवडकर नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार अश्विनीताई जगताप व भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रविजी अनासपुरे यांनी सर्व उपस्थितांशी सवांद साधत नव मतदार नोंदणी, आयुष्यमान भारत योजना व मोदी ॲप संदर्भात माहिती दिली.