कोयत्याधारी टोळीच्या घटनात वाढ

0
468

पुणे,दि. 28 (पीसीबी)-पुण्यात कोयताधारी टोळक्यावर अद्यापही पोलीसांना वचक ठेवण्यात यश मिळाले नाही.शहरातील अनेक भागात कोयत्याधारी टोळीच्या घटना घडताना दिसून येत आहेत.असाच एक प्रकार हडपसर मध्ये घडला आहे. टोकळ्याने कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती मुद्देमाल हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर आला. ही घटना रामटेकडी हडपसर येथील डॉ. डब्लू. आर. खान उर्दु शाळे मागील गल्लीत सार्वजनिक शौचालयाजवळील अण्णाभाऊ साठे वाचनालयात रात्री २६ जानेवारी रोजी ९ च्या सुमारास घडली.

याप्रकरणी निलेश पंडीत गायकवाड (वय.३१, रा. पितृकृपा बिल्डिंग स्वागत हॉटेल समोर मांजरी बु) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून करण, विशल्या, मुज्जा व शुभ्या (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश हे झोमॅटो कंपनीत डिलीवरी बॉयचे काम करतात. २६ जानेवारी रोजी फिर्यादी हे ग्राहकाची ऑर्डर देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान आरोपीनी अंधाराचा फायदा घेत अचानक फिर्यादी यांच्या दुचाकीच्या आडवे येवून शिवीगाळ करून दमदाटी केली आणि जबरदस्ती फिर्यादी यांची बॅग उचकटली व त्यातील हार्ड डिस्क, चेक बुक व २ हजार रुपये रोख असा एकुण ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावला आणि घटनास्थळावरून पळ काढला.आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.