अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

0
258

तळेगाव दाभाडे, दि. २४ (पीसीबी) : घरात घुसून आणि मुली सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

अनिरुद्ध प्रशांत इंदुलकर (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुली सोबत गैरवर्तन करत तिच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र फिर्यादी यांच्या मुलीने त्यास नकार दिला. तरीही आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.