भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बालगंधर्व चौकात काल सायंकाळी रास्तारोको आंदोलन

0
192

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) : भारत जोडो न्याय यात्रेवर आसाम मध्ये भाजपा सरकारने लाठीहल्ला करून राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, याच्या निषेधार्थ इंटकचे प्रदेशाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात काल सायंकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, इंटक शहर जिल्हा अध्यक्ष बळीराम डोळे, पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष प्रकाश पवार, अभिजित गोरे (NSUI), कसबा ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, इंटक सरचिटणीस मनोहर गाडेकर, सचिन कदम, हमिद इनामदार, सोमनाथ शेळके, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, आकाश शिंदे, शिवाजीनगर युवक अध्यक्ष आशुतोष जाधवराव, आशिष व्यवहारे, पर्वती युवक काँग्रेस अध्यक्ष केतन जाधव, दत्ता पोळ, किशोर मारणे, त्रबक हिप्परकर, शारदा वीर, रझीया बल्लारी, अक्षय कांबळे, छाया जाधव, मनिषा गायकवाड, अश्विनी गवारे, नलिनी दोरगे, अनुसया गायकवाड, शिवराज भोकरे, यशराज पारखी, योगेश शिर्के, मुरली बुधाराम, राजेंद्र पेशने, रेश्मा शिकलगर, आदिनाथ जावीर, दिपक ओव्हाळ उपस्थित होते. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, NSUI, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुलजी गांधीं यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आसाम मधील युवक, महिला आणि कामगारांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत पाठिंबा दिला आहे. या यात्रेच्या माध्यमातून आसाममधील भाजपा सरकार आणि मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांच्या जनविरोधी कारभाराचे राहुल गांधी यांनी जाहीर सभांमधून वाभाडे काढले आहेत. यामुळे बावचळलेल्या हेमंता बिस्वा सर्मा याने अगोदर गुंड पाठवून राहुल गांधी आणि भारत यात्रीवर हल्ला केला. आज पोलिसांना पुढे करत लाठीचार्ज केला. अनेक काँग्रेस कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांना जबर मारहाण करण्याचा षंढपणा आसाम सरकारने केला. काल राहुलजींना मंदिरात जाण्यापासून रोखलं आज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेटण्यापासून रोखलं. ही हुकूमशाही असाम आणि देशातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहतं आहे. जनता या दडपशाहीच्या विरोधात आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते याविरोधात आक्रमक झाले असून भाजपाला याची किंमत येणाऱ्या निवडणुकीत चुकवावीच लागेल.