हजारो मुलांनी चित्रकलेतून साकारले प्रभू श्री राम

0
254

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे विश्व हिंदू परिषद पिं.चिं व कलारंग सांस्कृतिक कलासंस्था पिं.चिं यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते,यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ३२ शाळां मधील इयत्ता सहावी ते बारावी मधील 1227 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये रामायणातील कोणत्याही एका प्रसंगावरती 1) श्रीराम व शबरी भेट, 2) श्रीराम व केवट भेट, 3)नल नील व प्रभू श्रीराम, 3) रावण वध, 4)आपल्याला आवडणारा “रामायणा ” मधिल प्रसंग आशा विविध विषयांवर चित्र काढायची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी कलारंग चे अध्यक्ष श्री अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषद पिं.चिं चे अध्यक्ष श्री धनंजय गावडे यांच्या सहयोगाने या भव्य चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्येत प्रभू श्री राम यांचे भव्य दिव्य असे मंदीर उभारले जात आहे त्या मंदिरात प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होत आसताना पिं.चिं शहरात असा भव्य उपक्रम घेण्यात आला. लहान मुलांपासून ते जेष्टां पर्यंत संपुर्ण वातावरण राममय झाले होते. या स्पर्धेला विशेष बक्षिस देखील ठेवण्यात आले आहे, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे  यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे.

आशा स्वरुपाचे बक्षिस ठेवण्यात आली आहे व लवकरच या बक्षिसांचे वितरण देखील करण्यात येणार.तसेच या सर्व चित्रांचे प्रदर्शन देखील ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेला विशेष मान्यवर उपस्थीत होते त्या मधे रा.स्व.संघाचे हेमंत हरहरे, निगडी प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिं.चि विश्व हिंदू परिषद अध्यक्ष धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री विशाल मासुळकर, विभाग मंत्री नितीन वाटकर, मा.नगरसेविका अनुराधा ताई गोरखे, पिं.चिं भाजपा उपाध्यक्ष राजु दुर्गे, भाजपा पदाधिकारी कैलास कुटे,गणेश लंगोटे,मनिषा शिंदे,उपस्थित होते ,या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध चित्रकार सुनील शेगावकर, सुमित काटकर, जोती कुंभार यांनी परिक्षण केले. लहान मुलांनी अतिशय अभ्यासपूर्वक चित्र काढली.

बोलताना देवदत्त कशाळीकर म्हणाले एकावेळी हजारो विद्यार्थी श्रीरामा विषयी विचार करून चित्र रेखाटतात ही अभूतपूर्व संकल्पना व योग आहे. धनंजय गावडे म्हणाले सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर चित्र रेखाटले असून विषय अवघड असतानाही अभ्यास करून शबरी श्रीराम भेट केवट श्रीराम भेट अशी चित्र रेखाटन म्हणजे स्पर्धेचा अभूतपूर्व यश आहे.सर्व स्पर्धकांचे परीक्षकांचे पाहुण्यांचे कलारंगाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले.