रावेत, दि. १९ (पीसीबी): बँकेने सील तोडल्या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार (दि.15) ते गुरुवारी (दि.17) या कालावधीत रावेत येथे घडली.
याप्रकरणी विजय राघोबाजी सोनकुसरे (वय 59 रा.पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.यावरून महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्गदर्शन सोसायटीमधील फ्लॅट आरोपीं यांनी महाराणा इलेक्ट्रीक कंपनीच्या नावाने कर्ज घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया देहुरोड यांच्याकडो तारण ठेवला होता. मात्र आरोपी यांनी कर्जाची परत फेड न केल्याने बँकेने तो फ्लॅट सील केला. मात्र आरोपी यांनी कोणत्याही परवानगी शिवाय फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.रावेत पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.