आंबेठाण, दि. १९ (पीसीबी): प्रकेजींग कंपनीचे शॉपचे पत्रे उचकटून चोरांनी त्यातून रोख रक्कम, मोबाईल व लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही चोरी बुधवारी (दि.17) रात्री ते गुरुवारी (दि.18) सकाळी या कालावधीत बिरदवाडी,आंबेठाण येथील प्रथमेश पॅकेंजीग कंपनी शॉपमध्ये झाली आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ईश्वर नामदेव सावंत (वय 35 रा.बिरदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुकान बंद असताना चोरांनी पत्रे उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी लोखंडी कपाटाचा दरवाचा उचकटून त्यातील रोख 15 हजार रुपये, 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, 10 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 45 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.