किरकोळ कारणावरून तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण

0
235

वराळे, दि. १९ (पीसीबी): रागाने का बघतो या कारणा वरून पाच जणांनी एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री वराळे येथे घडली आहे.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण चंद्रकांत माने (वय 25 रा. वराळे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून गुरुदेव मराठे, रमजान फुटणकर, साहिल म्हाळसकर, मयुर माने, गोट्या मराठे सर्व रा. वराळे, मावळ यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना गुरुदेव याने त्यांना आडवले व आमच्याकडे तू रागाने का बघतो म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. इतर आरोपींच्या संगनमताने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी व वडापावच्या गाड्यावरील कुकरने बेदम मारहाण केली. यात फिर्यादी हे जखमी झाले. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.