शरद मोहोळ हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता, मोठ मोठे गौप्यस्फोट

0
1267

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पुण्यातील कुख्या गुंड, गँगस्टर शरद मोहोळ दिवसाढवळ्या झालेल्या खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पनवेल पोलीसांनी सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे.

शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहोळ प्रकरणात रोज नव्या अपडेट समोर येत आहे. शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणेसह 10आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयीत आरोपी आहे. पनवेल पोलीसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केलीय. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केलीय. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याच तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलीसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे..

आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. परंतु आता शरद मोहोळ प्रकरणात रोज नव्याने नावे समोर येत आहे. रामदास मारणेचे नाव समोर आल्यानंतर वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. जमीनीच्या वादातून हत्या झाली आहे.