देवदर्शनाच्या बहाण्याने दरीत ढकलून पत्नीचा खून

0
194

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेल्यानंतर तिचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दरीत पडल्यानंतर ती झाडात अडकली. त्यानंतर तरुणाने साडीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले असून, तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोलसिंगने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार पोलीस बेपत्ता झालेल्या ललिताचा शोध घेत होते.

पुणे : पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेल्यानंतर तिचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दरीत पडल्यानंतर ती झाडात अडकली. त्यानंतर तरुणाने साडीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले असून, तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोलसिंगने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार पोलीस बेपत्ता झालेल्या ललिताचा शोध घेत होते.

दरीत कोसळल्यानंतर ती ‌झाडाच्या फांदीत अडकली. अमोलसिंग दरीत उतरला. साडीने गळा आवळून तिचा खून केला. ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.