शहरातील झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांसोबतच नेते आणि पत्रकारांची – माधव पाटील

0
161

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने नुकताच माधव पाटील यांना पर्यावरण या विभागासाठी पुरस्कार देण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सर्वच पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना माधव पाटील म्हणाले की आई ज्याप्रमाणे रोज तुळशीला पाणी घालते, म्हणजेच तुळशीची, झाडांची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देते. पण आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कुणीही यावे आणि झाडे तोडून श्रीमंत व्हावे अशी परिस्थिती आहे. दिवसा -ढवळ्या झाडे तोडली जातात पण कारवाई शून्य.पवना आणि इंद्रायणी नदीला तर आपण साधा स्पर्श करू शकत नाही ही या शहराची शोकांतिका आहे. आज भारताची आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत हे कोणालाही लगेच सांगता येणार नाही. याला कारण म्हणजे आपण पर्यावरणाच्या बाबतीत खूप उदासीन आहोत. तो पाणी बचत नाही तर वेळ आल्यास अंघोळीची गोळी सुद्धा घ्यावी लागेल.

मला पत्रकार संघाने पुरस्कार
दिला याचा अर्थ पत्रकार संघाने आणि सर्व राजकीय नेत्यांनी खिळे मुक्त झाडे या मोहिमेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता पत्रकारांची,सर्वपक्षीय नेत्यांची आणि पिंपरी चिंचवड शहरातील तमाम नागरिकांची जबाबदारी बनते की इथून पुढे आपल्या शहरातील झाडांची आणि नद्यांची पर्यायाने पर्यावरणाची काळजी घ्यावी.

यावेळी व्यासपीठावर संजोग वाघेरे पाटील, उमा खापरे,नाना काटे,मारुती भापकर,चेतन बेंद्रे,बाळासाहेब वाल्हेकर असे सर्वच पक्षांचे नेते उपस्तिथ होते. माधव पाटील यांना जेष्ठ पत्रकार अरुण खोरे, बापूसाहेब गोरे आणि सर्व राजकीय नेत्यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी पुरस्कार देण्यात आला.