कंपनीच्या सीईओ आईचे कृत्य, स्वतःच्या मुलाच्या हत्येनंतर देहाचे तुकडे करून बॅगेत भरले

0
117

बंगळुरु, दि. ९ (पीसीबी) – बंगळुरु या ठिकाणी एका स्टार्ट अप कंपनीच्या सीईओने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. सूचनाने तिच्याच मुलाची हत्या केली आहे. हे प्रकरणच काहीसं गुंतागुतीचं आहे. AI स्टार्ट अपची सीईओ सूचना सेठने गोवा सर्विस अपार्टमेंटमध्ये तिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूचनाचे आणि तिच्या पतीचे संबंध खूप तणावपूर्ण होते. तिने मुलाची हत्या केल्यानंतर त्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत ठेवला आणि त्यानंतर ती बॅग घेऊन ती टॅक्सीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी तिला अटक करण्यात आली. आपल्याच मुलाची हत्या करणारी सूचना सेठ कोण आहे जाणून घेऊ.

सूचना सेठ द माइंडफुल AI लॅबची संस्थापक आहे. गेल्या चार वर्षांपासून ती याच संस्थेचं नेतृत्व करते आहे. ही लॅब आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे. सूचना सेठने दोन वर्षे बर्कमेन क्लेन सेंटरमध्ये काम केलं आहे. तसंच सूचना सेठने बोस्टन, मेसाचुसेट्स यामध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग एथिक्स तसंच गव्हर्नेस मध्येही तिने योगदान दिलं आहे. द माईंडफुल या AI लॅबची सुरुवात करण्यापूर्वी सूचना सेठ बंगळुरुतल्या बूमरँग कॉमर्समध्ये सीनियर डेटा सायंटिस्ट म्हणूनही तिने काम केलं आहे. सूचना सेठ इनोव्हेशन लॅबशीही जोडली गेली होती. सूचना सेठ कंपनीच्या डेटा सायन्स ग्रुपमध्ये सिनीयर अॅनालिस्ट म्हणून कार्यरत होती. तिने २००८ मध्ये भौतिक शास्त्रात डिग्री घेतली आहे.सूरचना रामकृष्ण मिशन इन्स्टिट्युट ऑफ कल्चर या संस्थेतून संस्कृतही शिकली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही तिने केला आहे. अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत होती.

बंगळुरूस्थित एका AI स्टार्टअपच्या ३९ वर्षीय सीईओला सोमवारी रात्री तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सूचना सेठला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेने तिच्या पतीसह बिघडलेले संबंध हे एक कारण नमूद केले होते. महिलेने शनिवारी उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह चेक-इन केले होते आणि सोमवारी सकाळी चेक आउट केले.