सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचा बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

0
216

तळेगाव दाभाडे, दि. ८ (पीसीबी) – सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच लाख सात हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकास अटक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2021 ते 12 ऑगस्ट 2019 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

प्रमोद पंढरीनाथ चौधरी (वय 66, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी 4 जानेवारी 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास विश्वनाथ भालेराव (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे कैलास भालेराव याने आमिष दाखवले. त्यातून त्याने चौधरी यांच्याकडून पाच लाख सात हजार रुपये घेतले. त्यानंतर चौधरी यांच्या मुलाला नोकरीला न लावता त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.