जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

0
903

सुसगाव, दि. ५ (पीसीबी) : जमिनीच्या वादातून सख्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमजी मार्केट समोर पाटीलनगर, सुसगाव येथे घडली

लक्ष्मण गोबरिया रामावत (वय 35, रा. पाटीलनगर, सुसगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण रामावत यांचे मेहुणे संतोष टोपीया विश्लावत उर्फ पवार (वय 19, रा. एनडीए रोड, शिवणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिमराम गोबरिया रामावत (वय 37, रा. पाटीलनगर, सुसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीमराम याने त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण रामावत यांना जमिनीच्या वादातून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये लक्ष्मण हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत न देता रिमराम याने जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले. त्यात लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी रिमराम याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.