संजोग वाघेरेंवर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी

0
418

पिंपरी, दि. ५ (पीसीबी ) – उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचे समर्थक संजोय वाघेरे यांनी शिवबंधन बांधलं. ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर संजोय वाघेरे यांच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

यातच आता संजोग वाघेरेंवर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 डिसेंबर रोजी संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. संजोग वाघेरे यांनी अजित पवार गटातून ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

संजोग वाघेरे यांनी महापौरपद व राष्ट्रवादी काँग्रेसचं शहर अध्यक्षपद भूषवलं आहे. संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती.