पिंपरी दि.४ (पीसीबी) – ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र २५ व २६ मौजे वाकड येथील भुजबळ चौक ,मधुबन हॉटेल ते जगताप डेअरी चौक रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांची निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये एकूण अंदाजे ८२,५८० चौ. फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत वीट बांधकाम व पत्राशेड पाडण्यात आली आहेत.
निष्कासन कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील तसेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ.अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.या कारवाईत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उपअभियंता शांताराम कोबल, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, कार्यालयीन अधिक्षकअरुणकुमार सोनकुसरे बीट निरीक्षक अमोल शिंदे ,वैभव विटकरी, कनिष्ठ अभियंता महानगरपालिकेचे अतिक्रमण पथकातील कर्मचारी ,एम. एस. एफ जवान – २८, मनपा पोलिस – १६, पोलिस – ६, मजुर – २०, जेसीबी – २, टेम्पो – १, गॅस कटर – २, मनपा कर्मचारी व मजूर यांचे सहाय्याने करण्यात आली.