कारला धडक देत चालकाला जीवे मारण्याची धमकी

0
457

वाकड, दि. ०३ (पीसीबी) – कारला पाठीमागून जोरात धडक देत कारचे नुकसान केले. त्यानंतर धडक देणाऱ्या कार चालक महिलेने आणि तिच्या मित्राने समोरील कार चालकाला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी साडेसात वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाकड पुलाजवळ घडली.

सिद्धार्थ सुरेश नायर (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा शिवाजी कुदळे (वय 32, रा. धनकवडी, पुणे) आणि यश पांडुरंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नायर हे त्यांच्या कारमधून मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात होते. वाकड पुलाजवळ त्यांच्या कारला पाठीमागून एका कारने (एमएच 12/टीएस 7578) जोरात धडक दिली. त्यामध्ये नायर यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी नायर यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून येत कापून टाकतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.