गुगलमध्ये AI मुळे 30,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

0
419

विदेश,दि. २९ (पीसीबी) – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. कारण Google AI मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे. द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, गुगल लवकरच 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते.

द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, गुगल कंपनी आपले कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा प्रामुख्याने Google च्या जाहिरात विक्री विभागावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे, जिथे कंपनी ऑपरेशनल कामासाठी AI चा वापर करु शकते.

या बदलांबद्दल बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यवसायाची पुनर्रचना करणार असल्याचे मान्य केले आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हा निर्णय वर्षभरापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आला होता. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होती.जानेवारीच्या सुरुवातीला, पिचाई यांनी एका बैठकीत सांगितले होते की, कर्मचाऱ्यांची संख्या 6 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाशी चर्चा केली होती.


तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमधील कपातीचा आढावा घेणाऱ्या वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षी जागतिक स्तरावर (26 डिसेंबरपर्यंत) 1,178 तंत्रज्ञान कंपन्यांनी 2,60,771 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.