चहाच्या बिलावरून तरुणाला दगडाने मारहाण, एकाला अटक

0
569

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – चहाच्या बिलावरून झालेल्या भांडणात मित्रानेच एका तरुणाला दगडाने मारहाण केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी वाल्हेकर वाडी चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी गौस सय्यद शेख (वय 24 वाल्हेकर वाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मानतेश उत्तम याळगी (वय 20 रा बिजलीनगर) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार अल्ताफ शेख कमल चांडालिया व मुट्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या ओळखीचे असलेले आरोपींसोबत चहा पिण्यासाठी आकुर्डी स्टेशन जवळ आले होते. यावेळी चहा पिल्यानंतर चहाच्या बीलावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र फिर्यादी ते भांडण तेथे सोडून घराकडे जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकी वर आले व त्यांनी फिर्यादीला मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच अल्ताफ याने रस्त्यावर पडलेला टोकदार दगड घेऊन फिर्यादीला मारून त्यांना गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत , दमदाटी करून ते पळून गेले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कामगाराने चोरली जमीन मोजण्याची मशीन वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कामगाराने च मालकाची जमीन मोजण्याची मशीन चोरली आहे. ही चोरी वाकडी तील काळा खडक परिसरात बुधवारी घडली.

तात्यासाहेब रंगनाथ घेरडे (वय 35 रा काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून नागेश देवीराज सूर्यवंशी (वय 30 रा.नांदेड)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी हा फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये कामाला होता. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाची ट्रिंबल कंपनीची टोटल स्टेशन जमीन मोजण्याचे 50 हजार रुपयांची मशीन चोरून नेली आहे. बुधवारी हा सारा प्रकार उघडकीस येतात फिर्यादीने वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी दिली असून, वाकड पोलिसांचा तपास करत आहेत