पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पत्नी सोबत संबंध असल्याचे संशयातून एकाने दुसऱ्या तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करत कोणी हल्ला केला आहे. हा सारा प्रकार पिंपरी येथे सोमवारी (दि.25) सायंकाळी घडला.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात जीवन रामचंद्र केदारी (वय 33 रा खेड) यांनी बुधवारी (दि.27) फिर्यादी दिली आहे या फिर्यादीवरून एका 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्या पत्नीशी सुखदेव रंगनाथ केदारी याचे संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यामुळे आरोपीने केदारी व फिर्यादी ला घरी बोलावून घेतले.घरी बोलावून आरोपीने सुखदेव याला शिवीगाळ दमदाटी व शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जीवी ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीवर कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.