किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण

0
813

चिंचवड, दि. २७ (पीसीबी): जय हरी असे म्हणाल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड येथे घडली.

प्रजा धुमाळ (वय 28) आणि त्याचा साथीदार (दोघे रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी तरुणाच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा त्यांच्या घराशेजारी असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे त्याच्या तोंड ओळखीचे आरोपी होते. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना पाहून जय हरी असे म्हटले. त्या कारणावरून चिडून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला हाताने मारहाण केली. तसेच डोक्यात सिमेंटची वीट मारून गंभीर दुखापत केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.