शिक्षणामध्ये जेएसपीएम संस्थेने वेगळा ब्रँड निर्माण केलेला आहे

0
175
  • भाजपा महामंत्री विक्रांत पाटील

    पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – भारतामध्ये मोगलकालिन शिक्षणपध्दती बाजूला सारून देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाला सक्षम बनविणारी व तरूणांना घडविणारी शिक्षणपध्दती कृतीत आणलेली आहे. त्या शिक्षणाद्वारे जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेच्या अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत, पुणे पिंपरी शहरात शिक्षणामधून मुल्यावर आधारित वेगळा ब्रँड निर्माण केलेला आहे. असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील यांनी केले.

    यावेळी ते जेएसपीएम संचलित अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत, पुणे पिंपरी येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा नेते, किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रंजितसिह पाटील कव्हेकर, माजी नगरसेवक मोरेश्‍वर बोंडवे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुपकुमार मोरे, प्राचार्या कानिका आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना विकांतदादा पाटील म्हणाले, भारतामध्ये इंग्रज व मोगलकालीण शिक्षणामुळे देशातील तरूणांना बुध्दिवान असतानाही बेरोजगार बनविण्याचे काम केलेले आहे. मागील पुराणिक काळात भारताचा जगात शिक्षणामध्ये दबदबा होता. तो पुन्हा निर्माण करण्याचे कार्य पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवीन शिक्षणपध्दतीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे भारत देशाची प्रतिमा जगात उंचाविण्याचे काम होईल असे मतही भाजपाचे प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कानिका आनंद यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यासह पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती