भीमसॄष्टी मध्ये मनुस्मृती दहन प्रसंगाचे शिल्प उभारण्याचा मराठा सेवा संघाचा इशारा

0
288

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या भीम सॄष्टी मध्ये जे शिल्प उभे करण्यात आले त्यात बाबासाहेबांच्या जीवनातील क्रांतिकारक टप्पा असलेल्या मनुस्मृती दहन प्रसंग जाणिवपूर्वक वगळण्यात आले असून ते तातडीने उभारावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे यांनी आज केली.

पुष्यमित्र सुंग याने मनुस्मृतीची अंमलबजावणी करून मानवतेला काळिंबा फासणारा व माणसांना जनावरापेक्षा ही क्रूर वागणूक देणारा ग्रंथाची अंमलबजावणीला कठोर पद्धतीने सुरुवात केली व या मनुस्मृतीने संपूर्ण भारत देशाला विळखा घातला होता. यात नागरिकांना अपमानित व महिलांना अतिशय वाईट व तुच्छयेतेची वागणूक या धर्म ग्रंथांच्या आधारे देण्यात येत होती . अशा या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे दहन शेकडो वर्ष चालत आलेली समाज व्यवस्था नाकारली व भारतातील पीडित जनतेसह सर्व महिलांसाठी मुक्तीच्या मार्ग खुला केला आणि शिव , शाहू , फुले , आंबेडकरी विचारांच्या पुरोगामी नवीन संस्कृतीला खरे अर्थाने आधुनिक भारतात सुरुवात केली.

मनुस्मृतीच्या दहनाचा प्रसंग हा बाबासाहेबांच्या जीवनातील व त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अत्यंत क्रांतिकारक निर्णय होता. असा हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मनुस्मृती दहनाचे शिल्प सदरच्या भीमसृष्टी शिल्पातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक संतप्त झाले आहे व त्यांच्या भावना तीव्र झाले आहे. याची उदरेख कधीही होऊ शकतो याची गंभीरपणे दाखल घ्यावी . याचा विचार करून महानगरपालिका आयुक्तांनी सदरचे शिल्प भीमसृष्टी शिल्पा मध्ये समाविष्ट करावे . अशी मागणी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड रानवडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे कायदा कक्षाचे अध्यक्ष शिवश्री अँड श्रीराम डफळ, शिवश्री अँड सुनील रानवडे , शिवश्री दिलीप वाघ , शिवश्री राजू आवळे आदींनी सह्याचे निवेदन दिले आहे.