पिंपळे सौदागरला शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन

0
185

पिंपरी २५ :- राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी तुषार भाऊ कामठे म्हणाले “पिंपळे सौदागर हे आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची नगरी आहे या ठिकाणी आठवडाभर कामा मध्ये व्यस्त असणारे नागरिक रविवारी संध्याकाळी या आठवडे बाजाराचा नक्कीच फायदा घेतील शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे या ठिकाणी मिळण्याची सोय आमचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक”

ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत म्हणाले ” पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे निर्मिती अव्वलस्थानी आहे.शहरातील नागरिकांना स्वच्छ भाजीपाला व फळे मिळून देण्याचे काम या ठिकाणी होत असल्या कारणामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शेतकऱ्यापासून ते कामगार वर्ग पर्यंत कशाप्रकारे आपले कार्य आयुष्यभर केले हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले साधन आहे.”

संध्याकाळी चार वाजता बाजाराला सुरुवात झाली आणि नऊ वाजेपर्यंत विविध मान्यवर बाजाराला पेटी देऊन गेलेत त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर उपाध्यक्ष अनिल भाऊ भोसले,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर भाऊ चिंचवडे,राष्ट्रवादीचे नेते राजेश हरगुडे, काशिनाथ जगताप, राजाभाऊ खंडागळे, योगेश सोनवणे, नितीन मोरे, डॉ. काशिनाथ ब्राह्मणे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, ओबीसी विभाग भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष विशाल क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सागर भाऊ तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिली.