रस्त्यात थांबलेल्या डंपरला तीन वाहनांची धडक

0
393

रक्षक चौक, दि. २२ (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता रस्त्यात थांबवलेल्या डंपरला तीन वाहनांची धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) पाहते साडेचार वाजता रक्षक चौकाकडून राजीव गांधी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

अनुप वसंत कलबुर्गी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश अशोकराव आरसूळ (वय 24, रा. खराडी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/केपी 0882 या क्रमांकाच्या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील डंपर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता भर रस्त्यात उभा केला. या डंपरला फिर्यादी, त्यांचा मित्र आणि अनुप कलबुर्गी यांच्या वाहनांची धडक बसली. यात अनुप हे गंभीर जखमी झाले आहेत. तर तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.