विकसित भारत संकल्प यात्रा, बालाजीनगर मधील कार्यक्रमाचे उद्घाटन स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांच्या हस्ते

0
317

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभागांतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग नोंदविला तसेच उपक्रमांची माहिती घेऊन कल्याणकारी योजनांचा लाभही घेतला,क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे यांनी उपक्रमातील योजनांची सविस्तर माहिती उपस्थिती नागरिकांना दिली.

विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांना यावेळी देण्यात आला. त्यामध्ये पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना, मोफत आरोग्य तपासणी, आधारकार्ड दुरुस्ती केंद्र, गट प्रमाणपत्र वाटप, बचत गट नोंदणी अर्ज वाटप, मोफत औषधे वाटप, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत विविध योजना तसेच पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत लहान व्यावसायिकांसाठी १० हजार रुपये पर्यंतचे कर्ज अशा विविध योजनांचा समावेश होता.
इंद्रायणीनगर येथे ९०० पेक्षा जास्त तर बालाजीनगर येथे ५०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदान येथे ३०० पेक्षा जास्त तर नेहरूनगर प्राथमिक शाळा येथे ९०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.

या संकल्प यात्रेवेळी पिंपरी येथील कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी नगरसदस्य शंकर जगताप, नामदेव ढाके, तुषार हिंगे, केशव घोळवे, राजू दुर्गे, माऊली थोरात, अर्जुन ठाकरे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते अजय पाताडे, शेखर चिंचवडे तसेच वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बालाजीनगर येथील कार्यक्रमास स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, समाजविकास विभागाच्या रेश्मा पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

इंद्रायणीनगर येथील कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे, माजी महापालिका कर्मचारी नंदकुमार ताकवले तसेच प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

नेहरूनगर प्राथमिक शाळेतील कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे तसेच प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिक व मान्यवरांनी सामूहिक आत्मनिर्भर शपथ घेतली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी शपथेचे वाचन केले.