माजी नगरसेविकेसह तिच्या पतीची आणि अन्य पाच जणांनागुंतवणुकीच्या बहाण्याने पावणेतीन कोटींचा गंडा

0
984

पुणे, दि. १४(पीसीबी) -विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा देण्याच्या आमिषाने माजी नगरसेविकेसह तिच्या पतीची आणि अन्य पाच जणांना २ लाख ७६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी बतावणी केलेल्या सर्व कंपन्या बनावट असल्याचे समोर आले आहे.

आलीशान कारसह उमरा यात्रेच्या आमिषाने फसवले; आरोपी नादिर अब्दुल हुसेन नाईमाबादी, मौलाना शोएब आत्तारसह तीन जणांवर चौथा गुन्हा दाखल पुणे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा देण्याच्या आमिषाने माजी नगरसेविकेसह तिच्या पतीची आणि अन्य पाच जणांना २ लाख ७६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी बतावणी केलेल्या सर्व कंपन्या बनावट असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ५ मार्च २०२० ते १० मार्च २०२२ दरम्यान घडला.

मौलाना शोएब मोईनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), अफिफा शोएब आत्तार, खालीद मोईनुद्दीन आत्तार, माजीद उस्मान आत्तार आणि अब्दुल हुसेन हसन अली नाईमआबादी (रा. कॅम्प) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फिरोज हसण शेख (वय ४९, रा. अशोका म्युज, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. या आरोपींवर यापूर्वी समर्थ, लष्कर, कोंढवा पोलीस ठाण्यात कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शेख हे ऑल कोंढवा फाऊंडेशन या नावाने संस्था चालवितात. त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. साधारण २०१८ मध्ये आरोपींशी त्यांची भेट झाली. आरोपींनी ते आयात निर्यातीचा मोठा व्यावसाय करीत असल्याची बतावणी केली . तसेच त्यांच्या बऱ्याच कंपन्या असुन जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. फिरोज यांनी माजी नगरसेविका पत्नी नुसरत शेख यांच्याशी तसेच मित्र व नातेवाईकांसोबत चर्चा केली. साधारण २०२० मध्ये आरोपींनी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. आरोपींचा डायमंड नावाचा मोठा ग्रुप असुन डायमंड ग्रुपसह त्यांनी नॅश रिअल्टर्स, हनी एंटरप्रायजेस, मॅपल एंटरप्रायजेस, फॅशन झो, गुड चॉईस, युनिक द फॅशन, तोसिफीर हॉस्पिटलीटी, सक्सेस डेव्हलपर्स, डीझनीस फॅशन या आणि आणखी अनेक कंपन्या चालवित असल्याचे सांगितले. गुंतवणुकीवर दरमहा ३ टक्के पर्यंत नफा देत असल्याचे सांगितले. तसेच जर अडीच वर्षांसाठी गुंतवणुक केली तर तिप्पट रक्कम देणार असल्याचे सांगितले होते. तसेच आयात निर्यातीच्या शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुक केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल असे देखील सांगितले होते. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात नफा देण्यात आला.

आरोपी त्यांना सतत आयात निर्यातीच्या वेगवेगळया कंपन्यामध्ये भागीदार होण्यास सांगत होते. तसेच, या व्यावसायामध्ये पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करावी अशी विनंती करीत होते. परंतु, ते कुटूबांसह उमरा यात्रेसाठी सौदी अरेबियाँ येथे जाणार असल्याचे आरोपींना सांगितले. फिर्यादी ज्या टूरने सौदी अरेबिया येथे जाणार होते त्या टुरिस्ट कंपनीमध्ये सात लाख भरले. ही रक्कम गुंतवणुक केलेल्या नफ्यातील असल्याचे सांगण्यात आले. तसेच, त्यांना नवीन कार घ्यायची होती. आरोपी शोएब अतार याने नवी कार नफ्यामधून काढून देत असल्याची बतावणी करीत कार नावावर करून दिली. आरोपींनी लॉकडाऊन काळात औषधे व मेडीकल साधने मोठया प्रमाणात आयात व निर्यात होत आहेत असे सांगितले. आरोपींनी ‘तुम्ही आमचेकडे केलेली गुंतवणूक अडीच वर्षापर्यंत राहु द्या. सर्व रक्कमेवर आम्ही एकाचवेळी चांगला नफा देऊ’ असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गुंतवणूक अडीच वर्षापर्यंत ठेवण्यास तयार फिर्यादी तयार झाले. या व्यावसायाबद्दल मित्र रियाज इनामदार, रफिक अन्सारी, त्यांची बहिण साजिदा मुबारक (मयत), बाबा शेख, समी कंपाली यांना सांगितले. आरोपींनी व्यवहार पुर्ण झाल्यावर मिळणारा नफा हा करमुक्त असेल. सर्वांचे प्राप्तीकर टेक भरतील, सर्व कायदेशिर बाबी पुर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच राहील अशी हमी व भरवसा दिला होता. कांदा ,फळे, भाजीपाल्यासाठी शेतकऱ्यांना रोख पैसे द्यावे लागत असल्याचे सांगून त्यांच्याकडून रोखीत गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिरोज, त्यांचे मित्र आणि नातेवाईकांनी गुंतवणुक करण्याचे ठरवले. फिरोज यांनी वेळोवेळी १ कोटी ५३ लाख रुपये त्यांच्याकडे गुंतविले. तसेच मित्र रियाज इनामदार यांनी २५ लाख रुपये गुंतवले. रफीक अंसारी यांनी १५ लाख, बाबा शेख यांनी १५ लाख, अब्दुल बासीत अब्दुल समी कंपली आणि त्यांच्या वडिलांनी ६८ लाख रुपये गुंतवले. फिरोज यांना नवीन कार नावे करून देऊ तसेच उमरा यात्रा जाण्यासाठी ७ लाख लाख देऊ अशा भूलथापा दिल्या. परंतु, त्यांना कोणताही परतावा न देता तसेच रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील करीत आहेत.