कंपनी एचआर कडून कर्मचाऱ्याला मारहाण

0
205

खालुंब्रे, दि. १३ (पीसीबी) – कंपनी एचआरने इतर साथीदरांसह कंपनीतील कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना खालुंब्रे येथे सोमवारी (दि.11) रात्री घडली.

याप्रकरणी मंगलसिंग अरविंद सिंग (वय 23 रा.खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एच आर हिमांशू, अंकीत,कॉन्ट्रॅक्टर अमोल मुगले, सुपरवायजर यादव, अमित, दोन कामगार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मायक्रोटर्नर कंपनीमध्ये काम करतात, त्या कंपनीतील एच आर , सुपर वायजर कॉन्ट्रॅक्टर व कामगारांनी मिळून धमकी देतो का म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करत लाथु बक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. फिर्यादी या घटनेत जखमी झाले असता त्यांना त्यांच्या मित्रांनी खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.