जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत

0
226

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : अजित पवार… राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आक्रमक नेते… या दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद सुरु आहे तो फिजिकल फिटनेसला घेऊन… जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून अजित पवार यांनी टीपण्णी केली अन् मग जितेंद्र आव्हाड यांनीही त्याला जशास तसं पुराव्यासकट उत्तर दिलं. मग काय? सुरु झाला राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील वाद… या वादात आता अजित पवार गटातील एका युवा नेत्यानं उडी घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना थेट अभिनेत्री राखी सावंतचा दाखला देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजितदादा पवार यांच्याबाबत वक्तव्य करत असतात. मात्र त्यांच्या एवढ्या गोष्टी आमच्याकडे आहेत की, दादा मला माफ करा, असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, असा घणाघात सूरज चव्हाण यांनी केली आहे.
अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो ट्विट करत उत्तर दिलं. या प्रकरणावर सूरज चव्हाण यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. हाच तो सिक्सपॅक वाला फोटो…, म्हणत सूरज चव्हाण यांनी आव्हाडांना डिवचलं आहे.
आज विधिमंडळ अधिवेशनासाठी अजित पवार यांच्या शेजारी जितेंद्र आव्हाड यांना कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र नंतर आव्हाडांच्या नावाची पाटी हटवण्यात आली. यावर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र विधीमंडळ कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी लावली. विधीमंडळ हे काही त्यांचं कळवा मुंब्रा मतदारसंघ नाही, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

रोहित पवारांवर टीकास्त्र
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या सुरू आहे. यावरही सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. ही संघर्ष यात्रा नाही तर पिकनीक सुरु आहे. या यात्रेवर मीच नाही संपूर्ण जनता टीका करत आहे. मी फक्त व्हीडीओ ट्वीट केला. यांच्या राशीत कधीच संघर्ष नव्हता आणि संघर्ष यात्रा काढायला लागलेत. राहुल गांधीनी ज्याप्रमाणे देशत भारत यात्रा काढली. तसाच प्रकार रोहित पवार महाराष्ट्रात करत आहेत, असं सूरज चव्हाण म्हणालेत.