म्हाताऱ्या माणसाला का रागावतो म्हणत तरुणावर जिवघेणा हल्ला

0
610

पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) – तू रोज म्हाताऱ्या माणसाला का रागवतो म्हणत तीन ते चार जणांनी एका 31 वर्षीय तरुणार कोयत्याने व दारूच्या बाटलीने मारहाण करत जिव घेण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार सोमवारी (दि.4) पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी आकाश शम्मी सिंह (वय 31 रा.भाटनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आकाश भुंगा कांबळे (वय 25 रा. पिंपरी), संतोष पवार, राज , पवन मेवाले (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक वयस्क व्यक्ती जेवणासाठी पैसे मागत होती. यावेळी फिर्यादी यांनी त्या व्यक्तीला तु रोज मला का पैसे मागतो असे म्हणत रागावले. यावेळी आकाश याने तू रोज या म्हाताऱ्याला का रागवतो म्हणत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. मी कोण आहे ते तुला माहिती नाही, म्हणत त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले व फिर्यादीच सासू, पत्नी यांनाही धक्काबुक्की करत कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले तसेच सर्वांना मारून टाकण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच बीयरची बॉटल पाठीत मारत गंभीर जखमी केले. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.