मुंबई, दि. ३ (पीसीबी) – चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. तसंच आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जी भाजपाची टीम आहे त्या सगळ्यांचं श्रेय आहे. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नाही तर आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. आम्हाला यश मिळालं की ते ईडी, सीबीआयने दिलेलं यश आहे म्हणायचं आणि त्यांना यश मिळालं की जनतेचा कौल म्हणायचं. या मानसिकतेत जोपर्यंत विरोधक असतील तोपर्यंत ते सत्तेत येणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपाची मतं ही १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहेत. छत्तीसगडमध्ये १४ टक्क्यांमध्ये मतं वाढली आहेत. मध्यप्रदेशात ८ टक्के मतं वाढली आहेत. जनतेचा विश्वास हा भाजपावर आहे हेच पाहण्यास मिळतं आहे. आत्ताचे कल पाहिले तर ६३९ पैकी ३३९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. ५० टक्क्यांहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आहेत. हा निकाल जनतेच्या मनात काय आहे याची नांदी आहे. लोकसभेत जो अभूतपूर्व विजय भाजपाला मिळणार आणि एनडीएला मिळणार आहे त्याची सुरुवात आहे. इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलं आहे. राहुल गांधींचा अजेंडाही लोकांनी नाकारला आहे. लोकांच्या मनात मोदी आहेत. यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्यात पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल याची खात्री आहे. मात्र जनता मोदींच्या बरोबर आहे हे स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायतींमध्येमध्ये दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या. लोकसभेत हेच होणार आहे. महाराष्ट्रात आणि देशात आपल्या भारतीय जनता पार्टीच सत्तेत आलेली पाहण्यास मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.