ऑटो टॅक्सी व असंघटित मंडळाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांचे कल्याण होणार : उद्योग मंत्री उदय सामंत

0
157

वाहतूकदार असंघटीतांच्या प्रश्नांन मार्गी लावा : बाबा कांबळे

पिंपरीत ऑटो, टॅक्सी, बांधकाम मजूर, कंत्राटी सफाई कामगार कष्टकरी जनतेचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे दिमाखदार उद्घाटन

पिंपरी , दि. २ (पीसीबी) – ऑटो, टॅक्सी, बस, रिक्षा चालक मालक यांच्या साठी तातडीने कल्याणकारी मंडळ,मुक्त रिक्षा परवाना शासनाच्या माध्यमातून सोडविणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लवकरच महाराष्ट्रतील 3 कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सामजिक सुरक्षा,आरोग्य विमा व ईतर सुविधा मिळणार,आणि कष्टकऱ्यांचे कल्याण होणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ऑटो, टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन व ऑटो चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य कष्टकरी जनता आघाडी ,यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, असंघटित कल्याणकारी मंडळात रिक्षा चालकांच्या पेन्शनचा समावेश आहे. रिक्षा चालकांच्या आरोग्याची सुविधा आहे. रिक्षा चालकांचे बरे वाईट झाल्यास त्यांना विमा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक महिला सद्या रिक्षा चालवत आहेत. या महिलांना स्वस्त दरात रिक्षा मिळाली पाहिजे अशी तरतूद आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिवेशनाला शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात सर्व अडचणी सोडवू असे आश्वासन दिल्याचे मंत्री सामंत म्हणाले. अनेक कार्यक्रम करतो. मात्र कष्टकऱ्यांच्या हातून सन्मान होणे हे महत्वाचं मानतो असे मंत्री सामंत म्हणाले.

अधिवेशनाचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले की, देशात 45 कोटी बांधकाम मजूर, कंत्राटी सफाई कामगार, घरकाम महिला, फेरीवाले असे संघटित कामगार कष्टकरी आहेत. तर महाराष्ट्रातील 3 कोटी एवढी संख्या कष्टकरी बांधवांची आहे. एवढी मोठी संख्या असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांचा आवाज बनून आम्ही हे काम करत आहोत. या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो चालकांची संख्या देशांमध्ये 25 कोटी असून या घटकांना न्याय देण्यासाठी मी देशभर, तसेच महाराष्ट्रभर फिरत आहे. देशभरामध्ये सर्व एक झाले असून मजबूत संघटन उभे राहिले आहे. या घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढेही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असेन असे बाबा कांबळे म्हणाले.

या वेळी या अधिवेशनात विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मध्ये ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी वेल्फेअर बोर्ड स्थापन करून देशातील 45 कोटी ड्रायव्हर यांना सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी पेन्शन द्यावी. महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो, टॅक्सी, चालक-मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ घटित करण्यात यावे. महाराष्ट्रातील रिक्षाचा मुक्त परवाना तातडीने बंद करून देशभरातील सर्व इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट सक्ती करण्यात यावी. फेरीवाले, गरिबाला कायद्याचे अंमलबजावणी करण्यात यावे, छोटे बांधकाम मजूर, त्यांच्यासाठी कायदा व्हावा कंत्राटी पद्धत बंद करून सफाई कामगारांना पिंपरी चिंचवड व सर्व महापालिकेत कायम करण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते