पोलिसांनीच टाकली ईडीच्या अधिकाऱ्यावर धाड…! लाच घेताना रंगेहात पकडले

0
375

तामिळनाडु,दि.०२(पीसीबी) – सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या एका अधिकाऱ्याला डॉक्टरकडून २० लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. DVACच्या पथकाने ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचा DVACच्या पथकाने आठ किमीपर्यंत पाठलाग केला आणि त्यानतंर ही कारवाई केली. तामिळनाडुच्या डिंडीगुलमध्ये हा प्रकार घडलाय. यावेळी राज्यााचे पोलीस कर्मचारी कार्यालयाबाहेर तैनात केले होते. अटक केलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव अंकित तिवारी असं आहे. डिंडीगुलमध्ये ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्याच्या मदुराईतील उपविभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली. मदुराईतील त्याच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला.

ईडी अधिकारी अंकित तिवारीला डीवीएसी कार्यालयात नेत डिंडिगुलमध्ये न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०१६ च्या बॅचचा अधिकारी असलेल्या तिवारीने याआधी गुजरात आणि मध्य प्रदेशात काम केलं होतं. आता तो मदुराईमध्ये कार्यरत होता. अंकित तिवारीने आतापर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ईडीसोबत काम केलं आहे. केंद्रीय संस्थेत काम सुरू करण्याआधी अंकित तिवारीने ४ मोठ्या अकाउंटिंग फर्मसोबतही काम केलं होतं.

डीव्हीएसीच्या सूत्रांनी सांगितले की, ईडी अधिकाऱ्याला रोखण्यात आलं तेव्हा महाराष्ट्रातली रजिस्ट्रेशन असलेल्या कारमधून तो २० लाख रुपये घेऊन जात होता. एसपी सर्वनन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने डिंडिगुलच्या चेट्टीनाइकनपट्टीजवळ वाहनांचे चेकिंग सुरू केले होते. तेव्हा नागपूरला निघालेली कार थांबवली. पोलिसांना शंका वाटल्याने त्यांनी कारची तपासणी सुरु केली. तर त्यात २० लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आढळली. यानंतर कार आणि प्रवासी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं.