पुणे,दि.३०(पीसीबी) – पुणे पेशवा फिल्म फेस्टिवल २०२३ (पर्व पहिले) तब्बल ४८ फिल्मची मेजवानी असलेला हा समारंभ उत्साहाने पार पडला. दिग्दर्शक प्रवीण भोळे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पुणेरी पद्धतीने हा सोहळा पार पडला. अनेक दिव्यात दिग्दर्शक, राष्ट्रीय पारितोषिक चित्रपटांची कलाकृती पाहण्याचा योग पुणेकरांनी अनुभवला. याचे खरे श्रेय अनुप ढेकणे यांना जाते.
सर्वस्वी आयोजन करणारे अनुप ढेकणे हे स्वतः राष्ट्रीय पारितोषक विजेते दिग्दर्शक, लेखक, अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. पुण्यात प्रथमच आयोजित केलेले सर्व चित्रपट व राष्ट्रीय पारितोषक विजेते कलावंत दिग्दर्शक यांचा सहभाग आकर्षणाचा भाग ठरला. त्यात अमर देवकर, शिवाजी करडे, अविनाश पिंगळे यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शकांचा सहभाग मुख्य आकर्षण ठरले. तसेच पीसीबीचे चित्रपट विश्लेषक शिवराम हाके यांचीही या फेस्टिवलमध्ये प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दुसऱ्या परवाची वाट पाहण्यात सर्वांनी आनंद व्यक्त केला व आयोजक अनुप देखणे यांचे आभार मानले.