सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंना अटक

0
508

पुणे, दि. २९ (पीसीबी) – पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती नवले यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून, कोंढव्यात त्यांची सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. दरम्यान, या शाळेत नोकरी करत असलेल्या दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. परंतु, कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पीएफ घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात मारुती नवले याच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?
भविष्यनिधी कार्यालयाच्या पथकाने सिंहगड सिटी स्कूल शाळेला भेट देऊन 5 जुलै 2022 रोजी इन्स्पेक्शन केले होते. यावेळी शाळेतील लेखापाल यांच्याकडे भविष्य निधी संदर्भातील सर्व कागदपत्र मागवण्यात आले. ज्यात पगारशीट, बँके डिटेल्स, व्यावसायिक कर, बॅलेन्स शीट सह इतर कागदपत्रे शाळेकडून सादर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान, पगारपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या नोंदीनुसार 115 ते 116 कर्मचारी यांचे ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंत मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीचे 74 लाख 68 हजार 636 रुपये कपात करण्यात आले होते. परंतु, यापैकी 3 लाख 75 हजार 774 रुपये एवढीच रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. तसेच, 70 लाख 92 हजार 862 एवढी उर्वरित रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यातच आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून, संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्या करिता वापरली असल्याचा आरोप करत मारुती नवले यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत भविष्यनिधी निरीक्षक यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसात आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.