पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ३२ हजार कागदपत्रांत ४३१ कुणबी नोंदी

0
257

पिंपरी,दि. २२ (पीसीबी) : महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात येणार आहे. दरम्यान, या संदर्भात काम पाहणारे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मंगळवार पर्यंत ज्या नोंदी तपासल्या त्याची माहिती देताना १ लाख ३२ हजार ५९८ नोंदी मधून फक्त ४३१ कुणबी, मराठा कुणबी जातीच्या नोंदी सापडल्याचे सांगितले.



राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात येत आहेत. शिक्षण, कर संकलन, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदीच्या तपासणीचे काम सुरू आहे. वैद्यकीय विभागातील दोन हजार २२२ आणि कर संकलनमधील ११ हजार १८३ कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही.

शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा जातीच्या नोंदी तपासण्याचे नव्याने आदेश शासनाने दिले आहेत. त्याचे वर्गीकरण करून तसा स्वतंत्र अहवाल दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी त्याबाबतचा रिपोर्ट दिला. सन १९४८ ते १९६७ दरम्यानची ९२ हजार ४८४ कादगपत्रांच्या नोंदीत ५७, तर १९४८ पुर्वीच्या कालावधीतील ४० हजार ११४ कागदपत्रां पैकी ३७४ नोंदी मिळाल्या. दोन्ही मिळून १ लाख ३२ हजार ५९८ मध्ये ४३१ नोंदी सापडल्या.