पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 18) सायंकाळी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ भोसरी येथे करण्यात आली.

कुणाल सचिन डाके (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्र यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ भाजी मंडई येथे एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कुणाल डाके याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 50 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्याकडून शस्त्र जप्त करत याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article