कोयत्याचा धाक दाखवत मोहननगरमध्ये व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी

0
978

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – फटाक्याच्या दुकानावर येऊन दुकान चालवण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी फिर्यादीकडे पाचशे रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार देत पोलीसात तक्रार करतो, असे सांगताच आरोपी यांनी फिर्यादीला कोयत्याची भीती घालून शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

आजुबाजुच्या व्यापा-यांना कोयत्याचा धाक दाखविल्यामुळे सर्वांनी दुकाने बंद करुन घेतली. त्यावेळी आरोपींनी तेथुन जाताना ‘माझे ऐरियामध्ये धंदा करायचा असेल तर, मला हप्ता दिला पाहिजे’ असे ओरडत दुचाकीवरुन निघुन गेले. यापुर्वी आरोपींनी एकाकडून १०० रु. खंडणी वसुल केल्याच्या आणि दुसऱ्याला ५०० रु. हप्त्यासाठी जिवे मारायची धमकी दिली आहे. हा प्रकार (दि. १३) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास क्रांती चौक,मोहननगर, चिंचवड येथे घडला.

फिर्यादी कमलेश मुथा यांनी आरोपी १) जिलब्या ऊर्फ आकाश गायकवाड, २) आशिष गोरखा यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी पोलीस ठाण्यात १९१३/२३ भा.द.वि. कलम ३८६, ३८७, ५०४, ५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंड अॅक्ट कलम ७ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीगं पुढील तपास करीत आहेत.