आधी केले मग सांगितले संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी आदिवासींसोबत

0
180

संस्कारची दिवाळी अतिदुर्गम जिमलगट्टा या भागातील आदीवासी बांधवांसोबत साजरी

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) -संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि गडचिरोली जिमलगट्टा उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिमलगट्टा येथील आदिवासीं बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी अंध,अपंग, निराधार,कुष्ठरोगी व गरजवंत नागरिकांसाठी दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त लहान मोठे मुलं,मुली व महिला,पुरुष यांना कपडे,फराळ,मिठाई,औषधे,आकाश कंदील,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच विकलांग विद्यार्थ्यांकरीता साहित्यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आल्याने येथील नागरिकांमध्ये खूप उत्साहाचे आणि त्यांच्यामध्ये अफाट आनंद द्विगुणित करणारी परिस्थिती निर्माण झाली होती.

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने आदिवासी गरजवंतांकरीता मदतीसाठी फेसबुक आणि वाॕटसपच्या माध्यमातून केलेल्या जाहिर आवाहनाला प्रतिसाद दिला त्यामुळे लोकांना लागणारे अती आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होते.ते साहित्य घेऊन संस्कार प्रतिष्ठानची टिम दि.६ नोव्हेंबर ला बाबा आमटे यांच्या वरोरा येथील आनंदवन येथे पोहोचली.त्यांनी तिथे विकास आमटे यांची भेट घेत अंध अपंग मुकबधीर निराधार कुष्ठरोगी व शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून कपडे,साड्या,साखर,आकाश कंदिल सुपुर्त केल्या, तेथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कुष्ठरोगी पुरूष व महिलांना कार्यकत्यांनी स्वतः त्यांच्या जवळ जावून कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले.

दि.७ नोव्हेंबर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयाकरीता त्यांना आवश्यक असलेल्या औषधीं दिल्या, तेथील विद्यार्थ्यांना व महिलांना ही जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करून गोळा केलेले साहित्य भेट देण्यात आले.

दि.८ नोव्हेंबरला राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी सामाजिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीमलगट्टाचे पोलीस उपअधिक्षक अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर हे होते.प्रमुख अतिथी मध्ये संस्कार प्रतिष्ठान महा.राज्यचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड,जीमलगट्टा वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता मेडी,बॅंक तर सन्माननीय मान्यवर म्हणून संस्कार प्रतिष्ठानचे शब्बीर मुजावर,संध्या स्वामी,विजय आगम,आनंद पुजारी,प्रदिप बांदल,दिपिका क्षिरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास तीन हजार आदिवासी बांधवांना यावेळी मदत देण्यात आली.आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांतून आलेल्या तीन हजार आदिवासी बांधवांसाठी गडचिरोली पोलीस दलाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात सुजितकुमार क्षिरसागर यांनी पिंपरी चिंचवड कर आणि कोल्हापुर वासियांचे आभार मानले, गरजवंतांकरीता केलेल्या अनमोल सहकार्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचे खूप कौतुक करून सर्वांना शाबासकीची थाप दिली तसेच या उपक्रमात सहभागी कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.या भागातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी जीमलगट्टा शासकीय आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असल्याने या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शस्त्रधारी विविध तुकड्या सुरक्षेसाठी या परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या.

दि.४ नोव्हेंबर संध्याकाळी ५.०० वाजता गडचिरोलीत साहित्य घेऊन येणा-या गाडीचे पुजन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी साहेब आणि पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी गाडीची पुजा करून त्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला होता. याच भागातील जिमलगट्टा हद्दीतील आदिवासी बांधवांनी पारंपारिक असलेले आदिवासी रेला नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक पुजा गव्हाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीमलगट्टा सहा पोलीस निरिक्षक बिरादार,संस्कार प्रतिष्ठानचे डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पुजारी, विलास सैद,संध्या स्वामीं,मनिषा आगाम,शब्बीर मुजावर डाॕ पुजा जगताप मिलन गायकवाड उत्तम सादळकर दिप्ती जंगम,अशोक म्हेत्रे स्वाती म्हेत्रे जगन्नाथ नाळे पुष्पा नाळे आनंद विभुते सुवर्णा विभुते प्रदिप बांदल प्रभाकर मेरुकर सुप्रिया गायकवाड सुनिता गायकवाड अनिता मठपती मिनाक्षी मेरुकर कल्पना तळेकर वर्षा कुलकर्णी सायली सुर्वै नम्रता बांदल धनश्री चव्हाण शिला गायकवाड असे अनेकांनी अथक परिश्रम घेतले.पिंपरी चिंचवड मनपा सेवा निवृत्त शिक्षक संघटना आणि मोहन पटाधारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

१३७७ कि साखर,६५० कि रवा,६५० कि मैदा,१०० साबण,बेसनपीठ १० कि, तांदुळ २५० कि, तेल १३४ लि,साड्या २५०० लेडीज ड्रेस ,७०० पुरुष ड्रेस,१००० लहान मुलांची कपडे,६०० आकाश कंदिल ५००,खो तेल २५ नग,तुरडाळ ६० कि इ साहित्याचे वाटप केले