भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल

0
248

पिंपरी, दि.९ (पीसीबी) -भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक बुधवारी भाजप कार्यालय पिंपरी या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- १ राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले त्याच प्रमाणे इतर संघटनात्मक कामांचा आढावा भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी घेतला. आगामी लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीतही भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल असा संकल्प यावेळी करण्यात आला.

बैठकी साठी प्रामुख्याने भाजप जिल्हा अध्यक्ष शंकरभाऊ जगताप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. योगेश बाचल, माजी सत्तारुढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते श्री. राजू दुर्गे, सरचिटणीस श्री. शितल शिंदे, सौ. शैलजा मोळक, अजय पाताडे ,श्री. संजय मंगोडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. तुषार हिंगे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुजाता पालांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख श्री. अमित गोरखे, चिंचवड विधानसभा श्री. प्रमुख काळूराम बारणे, श्री. भिमा बोबडे, श्री. रवी देशपांडे, बाळासाहेब भुंबे, विनोद मालू सौ. आशा काळे, श्री. पोपट हजारे, श्री. मधुकर बच्चे, श्री. सिध्देश्वर बारणे, श्री. नामदेव पवार, सौ. राजश्री जायभाय, सौ सुरेखा बनकर, श्री. गुलाब बनकर, श्री. संतोष तापकीर, श्री. निलेश अष्टेकर, सोमनाथ भोंडवे, श्री. महेंद्र बाविस्कर, श्री. विशाल वाळुंजकर, श्री. नंदू कदम, श्री. अजय दुधभाते, श्री. सागर फुगे, श्री. देवदत्त लांडे, श्री. शिवदास हांडे, श्री. सज्जाद तांबोळी, अमेय देशपांडे, दिपक भंडारी आदी उपस्थित होते.