लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

0
290

वाल्हेकरवाडी ,दि.०७(पीसीबी) – पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली.

कृष्णा दिलीप केदार (वय 29, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9330159815, 9330683716, 916299296889, 7669800362, 9883795195 या क्रमांक धारक आणि बँक खाते धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा यांना आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन केले. तसेच टेक्स्ट मेसेजद्वारे दोन लिंक पाठवल्या. पार्सल डिलिव्हरीसाठी मेसेज मधील लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे कृष्णा यांना सांगण्यात आले. त्यानुसार कृष्णा यांनी लिकवर क्लिक करून दोन रुपये पाठवले असता त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये काढून घेण्यात आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.