पिंपरी ,दि.०७(पीसीबी) – दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा वराळे तालुका खेड येथे घडली.
याप्रकरणी अशोक मदनलाल बजाज (वय 28 रा वराळे) यांनी महाळूंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अशोक मोहनराम बडवड (वय 33 रा .वराळे ता खेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहिता ही फिर्यादी यांची बहीण होती. आरोपी अशोक बडवड याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन घरगुती कारणावरून पिढीतील रोज मारहाण करत होता. त्याच्या या शारीरिक व मानसिक क्षणामुळे विवाहितेला जगणे असह्य झाले होते. त्यामुळे तिने 1 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी महाळूंगे पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.