तरुणाला कोयत्याने मारहाण, सहा जणा विरोधात गुन्हा दाखल

0
624

बोपखेल, दि. ६ (पीसीबी) – पाच ते सहा जणाच्या टोळक्यांनी घरात घुसून एका तरुणाला कोयता व लातड दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.4) बोपखेल येथे घडली आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे, त्यावरून राहूल ताराचंद सौदे , निलेश अरविंद खरे, बादल वाल्मीक, अजय उर्फ भुरा वाल्मिकी,मुकेश वाल्मीकी, विकास उर्फ काळु सौदे (सर्व रा. बोपखेल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या नातेवाईकांसह घरी अशताना आरोपी बेकायदा जमाव जमवून घरात घुसले त्यांनी फिर्यादीचा भाऊ प्रमोद ढोलपुरीया याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांनाही शिवीगाळ करून फिर्यादीच्या भावाला लोखंडी कोयता व दांडक्याने मारहाण करत धमकी दिली. परिसरात सहशत माजवून आरोपी तेथून पळून गेले. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.