आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखे तर्फे रंगली संदीप उबाळे यांची दिवाळी स्वर पहाट

0
259

मुंबई,दि.०४(पीसीबी) – आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी डॉक्टरांची संस्था आहे.आणि ही संस्था फक्त डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचंच काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याच्या माध्यमातून बरीच समाजोपयोगी कार्य करत करत असते.त्याचप्रमाणे डॉक्टर्स मंडळी आपले ताणतणाव कमी करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करत असतात.जे सर्वांसाठी विनामूल्य ठेवले जातात.तसंच ह्या वर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे दिवाळीपहाट आज शनिवार दि.४नोव्हेंबर सकाळी ६ते ९ ह्या वेळेत गदिमा मुख्य नाट्यगृह प्राधिकरण आकुर्डी/निगडी येथे संपन्न झाला.

ह्या कार्यक्रमात खालील सेलिब्रिटी गायकांनी आपली गाणी सादर केली.इंडियनआयडॉल व झीसारेगामा फायनलिस्ट संदीप उबाळे ह्यांचं “सुर निरागस हो,कधी तू.. ,लागा चुनरी मे दाग,कभी मुझमे कही,परदा है परदा,ह्या गाण्यांसहित संभाजीमहाराज मालिकेचे शीर्षकगीत सादर करुन वन्स मोर मिळवले. सुर नवा ध्यास नवा विजेती सन्मिता धापटे शिंदे ह्यांची हे सुरांनो चंद्र व्हा,दिल चीज क्या है. अशी गाणी विशेष दाद मिळवून गेली. स्वप्नजा लेले ह्यांचं अधीर मन झालं,ऐरणीच्या देवा अशी गाणी सुपरहिट झाली. सौरभ दफ्तरदार ह्यांनी पाहिले मी तुला आणि मै हा झुमरू असे मराठी आणि हिंदी दोन्ही गाणी जोरात सादर केली.विशाल तेलकर ह्यांच्या गिटारवादनाने वन्स मोर मिळवले.विक्रम भट ह्यांनी तबल्यावर ढोलकी वादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.वेस्टर्न रिदम सांभाळलं अजय अत्रे ह्यांनी,आणि की बोर्ड वर साथ दिली मिहिर भडकमकर आणि अमृता ठाकूरदेसाई ह्यांनी.आणि ही सगळी गाणी आपल्या सुंदर निवेदनानं गुंफली स्नेहल दामले ह्यांनी.अतिशय नीटनेटकं आणि खुमासदार. रसिकांनी खूपच उत्साहात दाद दिली,शेवटच्या झिंगाट गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला.समस्त प्रेक्षकांनी नाचून घेतलं.थोडक्यात आयएमए पीसीबी ने सादर केलेली स्वरदिवाळीपहाट जबरदस्त गाजली.हा कार्यक्रम आयएमए सभासद,कुटुंबीय आणि मित्र परिवार सगळ्यांसाठी विनामूल्य होता.जवळजवळ ५००-६०० प्रेक्षकांनी लाभ घेतला.ह्यावेळी नगरसेवक राजू मिसाळ,अमित गावडे उपस्थित होते,त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच रुबीएल्केअर चे संचालक श्री.अपूर्व शहा,आणि सन टुरिझमच्या निशिता घाडगे ह्या प्रायोजकांचा व समस्त कलाकारांचा सत्कार देखील करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केलं होतं पैट्रन डॉ.कामत,अध्यक्ष डॉ.सुशिल मुथीयान,सचिव डॉ.टोणगांवकर, खजिनदार डॉ.विकास मंडलेचा,तसेच सांस्कृतिक कमीटी चेअरमन डॉ.संजीवकुमार पाटील आणि संचालक मंडळातील इतर सदस्य जसे की,डॉ.सुहास लुंकड, डॉ.दीपाली टोणगांवकर,डॉ.सुधीर भालेराव, डॉ.शुभांगी कोठारी हे सुद्धा संयोजनात सहभागी होते.