भाजप आमदारांची आज तातडिची बैठक, विषय गुलदस्त्यात

0
271

मुंबई, दि. २ (पीसीबी) : भाजपाचे तसेच भाजपा सहयोगी आमदारांना तातडीचा संदेश आला आहे. पक्षाचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांनी पाठविलेल्या या संदेशात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर बोलावल्याचे नमूद आहे. ही तातडीची व महत्त्वाची बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या बैठकीस मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार असून उपस्थिती अनिवार्य असल्याचे सूचित आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी यास दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य टाळले. मराठा आरक्षणाचा विषय सध्या ज्वलंत झाला आहे. सरकार कोंडीत सापडल्याचे म्हटल्या जाते. तसेच या प्रश्नावरून वातावरण हिंसक होत चालल्याने चिंतेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर सरकार विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलाविण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा होते. मात्र त्यावर जिल्ह्यातील एकाही आमदाराने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं या बैठकीत काय ठरणार यावर अवलंबून पुढे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होते.

मराठा आराक्षणाच्या मुद्यावर सरकार अडचणीत आले आहे. त्यातच आता ३१ डिसेंबर पर्यंत शिवसेना १६ आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांसह ८ मंत्री अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत सरकार टीकणार का याबाबच चर्चा सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर ३४ याचिकांची सुनावणी आज घेतली आहे.