दारूच्या नशेत गाडी चालवून नागरिकालाच अधिकारी असल्याचे सांगत दमदाटी

0
407

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) – गाडी चालवत एका तरुणाच्या गाडीचे नुकसान केले व अधिकारी असल्याचे सांगत तरुणाला दमदाटी केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारा प्रकार सोमवारी रात्री मुंबई बेंगलोर महामार्गावर ननावरे पुलाजवळ घडला.

याप्रकरणी सागर गोरखनाथ सुतार (वय 32 रा पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सुरज गोविंदराव देवरे (वय 33 कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून ननवरे पुलाजवळ आले असता आरोप देखील त्याच्या कारमधून भरधा वेगाने आला. त्याने फिर्यादीच्या गाडीला धडक देत फिरण्याचे गाडीचे नुकसान केले. यावेळी फिर्यादीने आरोग्याला जाब विचारला असता मी अधिकारी आहे. तुला कामाला लावतो म्हणत त्याने शिवीगाळ केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.