पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत महिलेची चार लाखांची फसवणूक

0
238

पिंपळे गुरव, दि. १ (पीसीबी) – पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत एक लिंक पाठवून त्याआधारे गोपनीय माहिती घेत महिलेच्या खात्यातून तीन लाख 98 हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री पिंपळे गुरव येथे ऑनलाईन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9441490201 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना त्यांना एक मेसेज आला. त्यामध्ये पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते. फिर्यादी यांनी मेसेज उघडून पहिला असता त्यामध्ये एक लिंक होती. त्यावर क्लिक करताच एक्सिस बँकेचे होमपेज सुरु झाले. तिथेच पॅन कार्ड आणि आधारकार्ड नंबर मागण्यात आला. फिर्यादी यांनी माहिती दिली असता ती माहिती सबमिट झाली नसल्याचा मेसेज आला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून दोन टप्प्यात एकूण तीन लाख 98 हजार 933 रुपये काढून घेण्यात आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.